धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. 03, देवसिंगा (तुळ), ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथे गळीत हंगाम 2026-27 च्या शुभारंभानिमित्त बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजन समारंभ उत्साहात पार पडला. व्ही.पी.के. उद्योग समूह, नांदेडचे संस्थापक तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रुपामाता परिवाराचे संस्थापक ॲड. व्यंकट विश्वनाथराव गुंड पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.

यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदार तसेच कर्मचारी दांपत्यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजनाची विधिवत पूजा करण्यात आली. यामध्ये गोटे रामलिंग भारत व गोटे श्रीदेवी रामलिंग, बिरू अंबादास बनछडे व अपर्णा बिरू बनछडे, विकास पांडुरंग जाधव व योगिनी विकास जाधव, प्रताप श्रीधर भोसले व उर्मिला प्रताप भोसले, जाधव श्रीकांत दयानंद व जाधव वर्षा श्रीकांत यांना पूजेचा मान देण्यात आला.

यावेळी बोलताना मारोतराव कवळे गुरुजी म्हणाले की, रुपामाता परिवाराने शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याबरोबरच सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या माध्यमातून स्वाभिमानाने उभे राहण्याची संधी दिली आहे. या भागातील युवकांचे पुणे-मुंबईकडे होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी रुपामाता परिवाराच्या उद्योगांमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, ही बाब या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

रुपामाता परिवाराचे संस्थापक ॲड. गुंड यांनी यावेळी बोलताना रुपामाता परिवाराच्या सर्व साखर उद्योगांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांच्या ऊसाला योग्य व सन्मानजनक दर देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, असे स्पष्ट केले. शेतकरी, कामगार, ऊस वाहतूकदार आणि उद्योग यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड पाटील यांनी कारखाना गळीत हंगामासाठी तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज असून, नियोजनबद्ध पद्धतीने गाळप प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी जनरल मॅनेजर सुधीर गाढवे, चीफ इंजिनिअर तानाजी ढेकळे, मुख्य शेतकी अधिकारी धनंजय गुंड, प्रेमनाथ पाटील, चीफ केमिस्टप्रसिद्ध  साहेबराव जाधव, सिव्हिल इंजिनिअर ओंकार निचळ, सुरक्षा अधिकारी ज्ञानेश्वर गुंड, एच.आर. मॅनेजर अनिल गायकवाड, सिव्हिल सुपरवायझर शरद पाटील यांच्यासह रुपामाता परिवारातील अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदार व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले.

 
Top