धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या 97 व्या जयंती निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या  संस्थेचे वतीने करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सलग दुसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी गट व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात व तीन फेऱ्यात घेण्यात येणार असून या स्पर्धेचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी आदित्य सुधीर पाटील, मंजुळाताई आदित्य पाटील, नूतन विद्यामंदिराचे मुख्याध्यापक पी.ए. गोरे, युवा स्पंदनचे अध्यक्ष महेंद्र कावरे, प्राचार्य गजानन वाले व इतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य के. टी.पाटील सरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य संतोष घार्गे,उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक के.के.पाटील, बी. बी.गुंड, बालाजी गोरे,राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ, सर्व हॉस्टेलचालक, विद्यार्थी बस वाहतूक संघाचे पदाधिकारी, सर्व विषयाचे प्रमुख व मराठी विषयाचे प्रमुख आणि सर्व मराठी अध्यापक व विद्यार्थी पालक उपस्थित होते. 

 
Top