भूम (प्रतिनिधी)-  शहराबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कलाकार दडलेला आहे. या कलाकारांचा सन्मान होणे गरजेचे आहे. मोबाईलमुळे गाव गाड्यातली संकटात सापडलेल्या कलेला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने अनुदान - मानधन स्वरूपात भरीव मदत केली तरच कला जिवंत राहणार आहे, अशी अपेक्षा  महाराष्ट्र राज्यातील लोककला अनुदान समितीचे अशासकीय प्रदेश सदस्य धनंजय खुडे यांनी जिल्हास्तरीय लोककला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. 

दि. 1 व 2 सप्टेंबर 2026 या दोन आदिवासी आयोजित केलेल्या मराठवाडा लोककला विकास मंडळ व मराठवाडा वृद्ध साहित्य कलाकार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लोककलावंत मेळावा व सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन राज्य शासनाचे सांस्कृतिक विभागाचे अशासकीय सदस्य धनंजय खुडे, रेश्मा मुसळे, पोलीस निरीक्षक अमोल मोहिते, जिल्हा अशासकीय सदस्य शंकर खामकर, दिलीप गरड महाराज, शिवाजी उगलमुगले यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.  दोन दिवशीय कला महोत्सव मेळावा मराठवाडा लोककला विकास मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव इंदलकर यांच्या पुढाकाराने व धर्मदूत हभप अरुण महाराज शाळू, दादासाहेब दळवी, महादेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या दोन दिवशीय कला महोत्सव मेळाव्यात पहिल्या दिवशी अभंग वाणीचा तर  दुसऱ्या दिवशी आराधी व इतर कलाकारांचा गजर घुमणार आहे. 

या दोन दिवशीय कला महोत्सव कार्यक्रमा दरम्यान शासकीय, निमशासकीय, सामाजिक स्तरावरील विविध क्षेत्रातील 25 व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमासाठी कलाकार संघटना अध्यक्ष किंचक गटकळ, सचिव विठ्ठल खामकर, सदस्य अश्रुबा वरळे, रामभाऊ हराळे, मनोहर साबळे, सुदाम सोन्नर,  दादासाहेब निकम, आश्रू खामकर, पुष्पा पोतदार, गोरख लवटे, दत्तू लोंढे, महादेव जाधव, उत्तरेश्वर खराडे,  सुबराव खंडागळे, रामहरी घाडगे, भारत खुळे, लक्ष्मण परबत, कुसुम दाते,  विजय पाटील,  रावसाहेब बोराडे, मारुती वाघ, महादेव नरके, पोपट पंडित यांनी परिश्रम घेतले.

 
Top