धाराशिव (प्रतिनिधी)- जि प धारशिव च्या उपाध्यक्षा आदरणीय उषाताई गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व नूतन गटशिक्षणाधिकारी श्री अक्षय देशमुख यांच्या स्वागताच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं सदरील कार्यक्रमात जिल्हा परिषद च्या उपाध्यक्ष श्रीमती उषाताई गायकवाड व धाराशिव गटशिक्षणाधिकारी आदरणीय अक्षय देशमुख साहेब यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखे तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विभागीय परीक्षा द्वारे निवड झालेले केंद्रप्रमुख श्री शेळके सर व श्री पाटील सर यांचाही सत्कार अखिल शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला सदरील कार्यक्रमास विस्ताराधिकारी हाके मॅडम विस्तार अधिकारी नागले साहेब विस्तार अधिकारी शिंदे मॅडम, राज्यपुरस्कार प्राप्त श्री समाधान शिकेतोड आणि सर्व ऑफिसचा स्टाफ आणिखाजगी व जिल्हापरिषद च्या जवळपास 30 शाळेचे मुख्याध्यापक आणि अखिल शिक्षक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी समकालीन प्रकाशन संस्थे च्या वतीने देणगीदारच्या माद्यमातून सदर जवळपास दोन लाखाची पुस्तके मोफत वाटप करण्यात आली यासाठी देणगीदार मिसेस अजन्ता पारखी पुणे व श्री हरिविजय गुर्जर मुंबई यांनी प्रत्येकी संच सहा हजार पाचशे प्रमाणे पंधरा संच ची देणगी दिली सदर पुस्तकातून विद्यार्थ्यां मद्ये वाचनाची गोडी लागेल व विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल असे उदगार मा. उपाद्यक्षा उषाताई गायकवाड यांनी काढले तर सदर पुस्तके विद्यार्थी व शिक्षकांनी नियमित पणे वाचली पाहिजेत असे आवाहन सर्व मुख्याध्यापक यांना नूतन गटशिक्षणाधिकारी श्री अक्षय देशमुख यांनी केले व यांच्या नोंदी ठेवाव्यात आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवावे असे सांगितले .आयोजक हाजी बशीर तांबोळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व देणगीदारांना धन्यवाद देऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व आत्ता पर्यंत धाराशिव तालुक्यातील बारा केंद्रात जवळपास 14 लाख रुपयांची पुस्तके देणगीदारांच्या माध्यमातून वाटप केल्याचे सांगितले, व देणगीदाराकडून भविष्यात अश्याच देणगी रूपाने मदतीची अपेक्षा व्यक्त केली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालोजी वाघमारे सर यांनी तर आभार प्रदर्शन अखिल चे तालुकाध्य नागनाथ मुडबे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद जानराव सर तुपारे सर मैनुदिन शेख सर आदींनी परिश्रम घेतले.
