भुम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पृथ्वीराज महादेव हासवले यांनी जिल्हास्तरीय 5 किमी चालणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्याची विभागीय 5 किमी चालणे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तर यशोदीप प्रमोद कांबळे यांनी जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्याची विभागीय गोळा फेक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ही स्पर्धा धाराशिव येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचा शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष शिंदे यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रा.एम जी सूर्यवंशी पर्यवेक्षक प्रा.आर.डी.सोळंके प्रा.जी.सी.काळे, रामचंद्र डोके, कृष्णा केंद्रे, अक्षय बिराजदार तसेच सर्व प्राध्यापक यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
