भूम (प्रतिनिधी)- तालूक्यातील माणकेश्वर येथील जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुवैद्यकीय चिकित्सालय माणकेश्वर येथे पाळीव श्वानाना रेबीज लसीकरण करण्यात आले..यावेळी पशुवैद्यकीय चिकित्सालय माणकेश्वर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ सुरज गुळमिरे, पशुधन पर्यवेक्षक डॉ रामचंद्र खताळ, डॉ समाधान अंधारे, डॉ पार्थ राऊत व सर्व स्वान प्रेमी उपस्थित होते.
एकच लस, सुरक्षित जीव“ हा संदेश देत माणकेश्वर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात सोमव दि. 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन श्वानांना लसिकरण करूण व श्वान प्रेमींना मार्गदर्शन करून व जनजागृतीने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील पाळीव श्वानांना मोफत रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लसीकरण केले. शेतकरी व तरुण श्वानप्रेमींनी आपले श्वान लसीकरणासाठी आणले होते.
रेबीज हा 100% घातक पण 100% प्रतिबंध करता येण्याजोगा आजार आहे. पाळीव कुत्र्याला वेळेवर लस दिली तर तो आजारापासून वाचतोच, पण त्याच्या संपर्कात येणारा मालक आणि कुटुंबही सुरक्षित राहते. म्हणून दरवर्षी नियमित लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. पशुधनविकास अधिकारी सुरज गुळमिरे यांनी सांगीतले. पशुधन व श्वान हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. त्याचे आरोग्य जपण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग नेहमी प्रयत्नशील असल्याचे यावेळी डॉ रामचंद्र खताळ यांनी सांगीतले.
या उपक्रमाचे श्वान प्रेमीतून व ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. रेबीजमुक्त गाव करण्याच्या उपक्रमा चांगला प्रतिसाध मिळाला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकरी पशुपालक श्वान पालकांनी आपल्या पाळीव श्वानांना लसीकरणासाठी आणले होते. रेबीज हा जीवघेणा आजार असून वेळीच लसीकरण केल्यास पाळीव प्राणी आणि मानव दोघेही सुरक्षित राहतात, याबाबत जनजागृती करण्यात आली.
