उमरगा (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज, 7 सप्टेंबर 2026 रोजी उमरगा येथे भव्य जनआंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते बाबा पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख सुधाकर मकरध्वज पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही मराठवाडा विकासापासून वंचित असून 'मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा' अशी सद्यस्थिती आहे, असा आरोप याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी केला. उमरगा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी, सन 2020 पासून प्रलंबित पीक विमा व अनुदानाची रक्कम त्वरित अदा करावी,आगामी रब्बीसाठी मोफत खते-बियाणे द्यावेत आणि शेतीसाठी 12 तास विनाखंड वीज द्यावी, 21 टीएमसी पाणी व नदीजोड प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत,पायाभूत सुविधा व रस्ते, मध्ये पाणी-वीज पुरवून स्थानिक रोजगार निर्माण करावा; तसेच शाळा व शासकीय रुग्णालयांची अवस्था सुधारून रिक्त पदे भरावीत.
मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास प्रशासनाविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी प.स. सदस्य हरिभाऊ जाधव शेतकरी सेना जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे तालुका प्रमुख विजयकुमार तळबुगे माझी सभापती रणधीर पवार संचालक किरण कुकुर्डे सिद्धराम हत्तरगे, रजाक अत्तार, संतोष कलशेट्टी, मारुती थोरे, आप्पाराव गायकवाड, अण्णाराव माने संतोष जाधव, नितीन बिराजदार, माधव जाधव, जीडी बिराजदार, विलास माने, यांच्यासह गणप्रमुख , शाखाप्रमुख व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
