धाराशिव (प्रतिनिधी)-  हायवेवर मारहाण करून लुटणारी कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली असून, त्यांच्याकडून 24 लाख 8 हजार 50 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, 

धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास बातीमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक आयशर टेम्पो मध्ये दरोड्याचे साहित्य घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर वाहन हे सोनेगावकडे जाणारे रोडवर असताना पहाटे एक आयशर भरधाव वेगाने आला. त्याला उभा राहण्याचा इशारा केला असता आयशर चालकाने नमुद आयशर हा पोलीस पथकास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अंगावर घातला असता ते बाजूला झाल्याने थोडक्यात बचावले. त्यानंतर सदर आयशर पुढे निघुन गेला. त्यावर पथकाने  आयशर टेम्पोचा पाठलाग करुन अंबेजवळगा शिवारातील स्थानिक लोकांच्या मदतीने इसमांना ताब्यात घेतले.  सदर लोकांना नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आनंद उर्फ आकाश शामराव पवार, वय 27 वर्षे, रा. आळणी ता. जि. धाराशिव, बल्या उर्फ सोनु अशोक शिंदे, वय 23 वर्षे, रा.गोलेगाव ता. भुम जि. धाराशिव, शंकर गणा काळे, वय 24 वर्षे, रा. जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव, असे सागिंतले. इतर तीन पळून गेले. पथकाने त्यांचे ताब्यातून एक इटकरी रंगाचा आयशर टेम्पो  क्र. एमएच 24 बीडब्ल्यु 9506 असे एकुण 17 लाख 50 रूपये असा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलीस पथकाने आरोपी यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांना सागिंतले की, पोलीस ठाणे ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, नळदुर्ग हद्दीमधील सोलारचे केबल ही आम्ही चोरी केली असल्याचे सागिंतले. त्यानी यापुर्वी नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत मध्ये रोडवरुन जाणारे नागरिक यांचे कडून जबरीने लुटलेला माल सदर इरटीगा कार व सोन्याचे दागिने असा एकुण 24 लाख 8 हजार 50 रूपयांचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करुन नमुद तीन आरोपीस मालासह धाराशिव ग्रामीण  पोलीसांच्या ताब्यात दिले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद  इज्ज्पवार, सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ राहुल नाईकवाडी, पोहेकॉ बळीराम शिंदे, पोहेकॉ अमोल चव्हाण, चालकपोकॉ केदार शेरखाने, विनायक दहीहंडे, प्रकाश बाईनवाड, व  पथक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 
Top