धाराशिव (प्रतिनिधी)- एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ व तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक युवा महोत्सवात धाराशिवच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
महोत्सवातील शोभायात्रेत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, धाराशिवच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आकर्षक ‘वेशभूषा' थीमला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माता रमाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धाराशिवच्या विद्यार्थिनींनी वक्तृत्व स्पर्धा व मराठी कविता या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच माता रमाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धाराशिवच्या विद्यार्थिनींनी लोकनृत्य मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
या सर्व पुरस्कारांचे वितरण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे सर व सौ. दीपा ताई रोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माता रमाबाई कॉलेजच्या प्रा. डॉ. शैलजा पैकेकर मॅडम व नालंदा कॉलेजच्या प्रा. वृषाली भोसले मॅडम यांनी अभिनंदन केले.

