धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले व धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल गवळी गल्लीतील श्री ची पूजा विधि पूर्व भारताची संविधान व विविध धर्मग्रंथांची गीता बायबल ,बौद्ध, जैन, ज्ञानेश्वरी, इत्यादी ग्रंथांची  पूजा विधि अरविंददादा गोरे जीवन गौरव पुरस्कार व आमदार विक्रम काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गौरवशाली व अभिमानास्पद काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान डॉ. प्रवीण बनकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये एक लाख दहा हजार निधी दिले बनकर यांना आदर्श शिक्षक  पारितोषिक मिळाले होते. जागतिक ह्रदय दिन साजरा होत असताना धाराशिव शहरातील डॉ. सतीश पवार जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 250 पुस्तके वैद्यकीय महाविद्यालयास नव विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोफत देण्यात आले याबद्दल डॉ. दत्तात्रय खुणे डॉ. अमन खान डॉक्टर नितीन भोसले डॉ. रोहित हिबारे एमबीबीएस ची पदवी ग्रहण करून उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला, हर्षद वेदपाठक अभियंता यांनी आपली एक किडनी स्वतःच्या बहिणीस देऊन जीवनदान दिले याबद्दलउच्च न्यायालयात पी. डी. सीबीआय विभागातर्फे विशेष सरकारी अभियोग्यता म्हणून अँड अमित मुंडे नेमणूक झाल्याबद्दल, इत्यादींचा मंडळाची श्री ची प्रतिमा शेला श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपल्या मंडळाच्या कार्याविषयीची प्रतिक्रिया दिले यावेळी अरविंद दादा गोरे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले मी 40 वर्षापासून मंडळाच्या व्यासपीठावर येतो येतो जिव्हाळ्याची माणुसकीची नातं टिकून ठेवला आहे .मंडळाचे कार्य हेच लोकमान्य टिळकांनी घालून दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण होतात. आमदार विक्रम काळे यांनी आपल्या मनोगतातून मंडळाच्या कार्याविषयी व पुढील कार्याविषयी कौतुकास्पद   काढले समाजातील विविध क्षेत्रातील वंचित घटकांना देखील पूजा विधि व सन्मानाचे स्थान देऊन सामाजिक सलोखा मंडळ 62 वर्ष विधायक कार्याला वाहून घेतलेले चित्र दिसते, संस्था मंडळ उत्सव सन साजरे करायचे असतील तर हा मंडळाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. मंडळाच्या वतीने प्राध्यापक गजानन गवळी मनमत पाळणे, गिरीश पाळणे, राजकुमार दिवटे, विश्वास दळवी, वरून साळुंखे, अँड बारखडे अँड कोनाले यांनी सन्मान व कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. काशिनाथ दिवटे यांच्या मंजुळ स्वरात व शंख घंटानाद ढोल ताशा यांच्या आवाजाच्या निनादात श्री ची पूजा विधि व विविध आरती संपन्न झाली. या कार्यक्रमाचे संचालन भालचंद्र हुच्चे व अमोल दिवटे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटप व शोभेची दारू व फटाक्याच्या  आतशबाजीमध्ये संपन्न झाली.

 
Top