तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील वेताळनगरमध्ये महिलांनी एकत्र येत जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा केला. भाग्यश्री व जयश्री कदम-सोंजी यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात महिलांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पाळणा सजवून पूजा-अर्चा केली.
यानंतर महिलांनी दांडिया खेळत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी श्रीकृष्ण व राधेच्या वेशात मोठ्या संख्येने बाळगोपाळ तसेच महिला भगिनी सहभागी झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
