भूम (प्रतिनिधी)-  रविंद्र हायस्कूल, भूम येथील 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे, संघभावनेचे आणि जिद्दीचे दर्शन घडवत हे उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशामुळे रविंद्र हायस्कूल, भूमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, पालक व सर्व विद्यार्थ्यांकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात आले.

स्पर्धेत वेदांत मुरलीधर धारकर, कार्तिक रामचंद्र वराळे, आर्यन राहुल भोसले, कृष्णा बंडू शेळके, अथर्व रामराजे मोळवणे, अथर्व सुखदेव डोके, समर्थ विजय शेंडगे, मयंक नितीन माळी, प्रणव विनोद डोके,  किरण सुधीर जेकटे, आर्यन बालाजी काळे, आशिष अरविंद अवधुते, वेदांत धनंजय बेलकर, आयुष गणेश कवाळे, फरहान शोएब सय्यद, अबूसुफियान अख्तर जहागीरदार हे विद्यार्थी सहभागी होते.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभल्यामुळे हे यश शक्य झाले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तालुकास्तरीय विजयानंतर शाळेत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अया सत्कार समारंभास संस्थेचे सचिव  आर. डी. सुळ, मुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, क्रीडाशिक्षक अमर सुपेकर हे उपस्थित होते.


 
Top