उमरगा (प्रतिनिधी)- यंदाच्या चालु हंगामात उमरगा व लोहारा सरासरीपेक्षा अत्यंत कमी व खंडीत पाऊस झाला आहे. सुरूवातीला थोडा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु तालुक्यात मागील दीड महिन्यांपासुन पावसाने खंड दिला असल्याने सोयाबीन, तुर, मुग, उडीद आदी खरीप पिके करपुन जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असुन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस न पडल्याने परिसरातील विहीरी, कुपनलिका आणि मुख्य जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. अनेक गावांमध्ये आत्तापासुनच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवु लागली आहे. तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असुन पशुपालक हवालदील झाले आहेत.  पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. बँकांचे कर्ज, खाजगी सावकारांचे देणे, आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेने शेतकरी मानसिक दबावाखाली आहेत. 

या अनुषंगाने मंगळवार दि.01 रोजी उमरगा लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार उमरगा यांच्याकडे धाराशिव जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी निवेदनादवारे करण्यात आली आहे.  निवेदनात, धाराशिव जिल्हयासह उमरगा व लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना प्रति हेक्टर नुकसानभरपाई देण्यात यावी, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करण्यात यावेत, जनावरांसाठी पंचायत समिती गण निहाय चारा छावण्या उभारण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

निवेदनावर नगराध्यक्ष किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, सभापती ॲड.आकांक्षा चौगुले, लोहारा सभापती पल्लवी जानकर, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, उपतालुकाप्रमुख नरेंद्र माने,  चंद्रशेखर सुर्यवंशी, व्यंकट पाटील, शेखर मुदकण्णा, गटनेते पंढरीनाथ कोणे,  नगरसेवक सचिन जाधव, शफी चौधरी, राहुल शिंदे, पंचायत समिती सदस्य तुकाराम जाधव, मन्मथ स्वामी, स्नेहा जाधव, खयुम चाकुरे, लिंगराज स्वामी, हणमंत गुरव, शेखर घंटे,  भगत माळी, विजय भोसले, दत्ता डोंगरे, नाना मदनसुरे, मनोज निकम, शरद इंगळे, सुनिल राठोड,  अमोल सोमवंशी, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी माडीवाले, शरद पवार आदींच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top