परंडा (प्रतिनिधी)- गायरण जमिनी पारधी आदिवासी समाजाच्या नावावर करण्यात याव्यात,या प्रमुख मागणीसाठी पारधी आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.या आंदोलना दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून विविध मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
यावेळी संजयकुमार बनसोडे म्हणाले की, पारधी आदिवासी समाज अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जात आहे.समाजाच्या हक्काच्या गायरण जमिनींचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेऊन पात्र लाभार्थ्यांच्या नावे जमिनी करण्यात याव्यात.तसेच समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पारधी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आरपीआय (आठवले) पक्ष सातत्याने आवाज उठवत राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या आंदोलनात राहुल पवार, विजय शिंदे, सत्यवान भोसले ,महेश भोसले,शाहीर शिंदे,काळू शिंदे, बाळू शिंदे ,समाधान काळे, गणेश पवार, दीपक काळे, रूपाली पवार ,रेश्मा भोसले, महादेवी शिंदे, राजवीर शिंदे, अमोल शिंदे, जयसिंग शिंदे, सुदर्शन शिंदे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
