धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य के.टी. पाटी  यांच्या 97 जयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे दुसरे पर्व थाटात संपन्न झाले.

तिसऱ्या फेरीच्या समारंभाचे उद्घाटन धाराशिव जिल्हयाचे  प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती दैवशाला हाके, दै .आरंभचे संस्थापक संपादक चंद्रसेन देशमुख, दै. संचारचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर, युवा स्पंदनचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांच्या हस्ते गुरूवर्य के.टी. पाटील सरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रथम स्पर्धकांना शुभेच्छा देताना शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी अशा स्पर्धेतून विद्यार्थी घडत असतो. असे मत व्यक्त केले. तर पत्रकार रवींद्र केसकर स्पर्धकांना मार्गदर्शन करताना  विद्यार्थी - गुरु यांच्या नात्याचे महत्त्व  सांगताना  झाड आणि ऋतू चा हृदयस्पर्शी दृष्टांत दिला. तर सरचिटणीस प्रेमाताई यांनी विदयार्थ्यांच्या जडणघडणीत विविध स्पर्धेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले केले. यावेळी संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक कुमार निकम, के. के. पाटील, शेषनाथ वाघ, राजेंद्र जाधव, बालाजी गोरे, शरद क्षीरसागर, बी. बी. गुंड उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातून तब्बल 380 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला . प्राथमिक व माध्यमिक गटात झालेल्या स्पर्धेत स्पर्धकांनी अतिशय दर्जेदार भाषण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम कुमारी जगदाळे सृष्टी साहेबराव, गुरुवर्य के. टी. पाटील फांऊडेशन रुपये 11 हजार,  द्वितीय वडवराव प्रबुद्ध  किशोर ( जि.प प्रशाला , मसला खुर्द ) 7 हजार, तिसरा गंदुरे अथर्व नितीन, भोसले हायस्कूल अंतर्गत के.टी .पाटील फाऊंडेशन - 5 हजार रुपयाचे बक्षीस पटकावले  तर उत्तेजनार्थ मध्ये कु. शितोळे स्वरा बालाजी, हेडे प्रतीक्षा कबीरदास शिंदे स्वराली श्रीपाद तसेच माध्यमिक गटात प्रथम -कु . गुरव वसुंधरा संजय - समता माध्यमिक विद्यालय,धाराशिव  11 हजार,द्वितीय कुमारी खोत राशी हनुमंत, सुबोध विद्यालय तेरखेडा  7 हजार तर तिसरा क्रमांक लंगडे ओंकार अर्जुन श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव - 5 हजार रुपयाचे बक्षीस  यासोबतच उत्तेजनार्थ मध्ये कु. नरवडे प्रगती नामदेव, कुमारी अंधारे प्रणाक्षी हरी लोकमान्य विद्यालय मानकेश्वर तालुका भूम या विद्यार्थ्यांनी   पटकावले . सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा . डॉ.रवी सुरवसे , महेंद्र कावरे ,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती जयमाला वटणे , मुख्याध्यापिका जयश्री माळी यांनी काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  मराठी विभाग प्रमुख कमलाकर पाटील सह  एन.एस. मुळे ,निखिल गोरे,शरद करडे, पी.ए.बेलदार, एस. एस. बनसोडे,दीपक केंगार, धम्मपाल यादव, एन.बी. कोळी,ए.व्ही. शेंडगे, एस.एम. शिंदे, पी.डी. इंगळे, एस. बी. कुदळे, जे.बी. मस्के, एम.पी. पवार, एम. पी. ठाकूर , सौ.जयमाला शिंदे  यांनी काम पाहिले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख के.पी.पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप जगताप व जे.बी. मस्के यांनी केले. तर सर्वांचे शेवटी आभार प्राचार्यांनी मानले. तर चित्रिकरण सुरज सपाटे, शिवाजी भोसले यांनी केले. 

 
Top