तुळजापूर (प्रतिनिधी)- क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती तुळजापुरात उत्साहात साजरी करण्यात आली.
अवघ्या 23 वर्षांच्या आयुष्यात भगतसिंग यांनी देशासाठी केलेले बलिदान भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांचे धैर्य, त्याग, सामाजिक समतेचा विचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची भूमिका आजच्या युवकांसाठीही प्रेरणादायी आहे.
जयंती उत्सवापुरती नको; विचार आचरणात आणा
यावेळी बोलताना विजय गंगणे म्हणाले की भगतसिंग यांची जयंती केवळ उत्सव म्हणून साजरी न करता त्यांच्या विचारांचा अभ्यास करून देशाप्रती कर्तव्यभावना, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. युवकांनी शिक्षण, सामाजिक जनजागृती आणि समाजहिताच्या कार्यातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय सर गंगणे, माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे, अनिल हंगरकर, प्रमोद भोरे, नेताजी साठे, मनोज आप्पा गवळी, ओमकार लोंढे, आकाश माने, सचिन वाघमारे, जगदीश पाटील, दादा दळवी, किरण हत्तीकर, श्रवण, प्रवीण पाटील, बालाजी नाईकवाडी, रवी प्रताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
