धाराशिव (प्रतिनिधी)- स्वर्गीय बाळासाहेब दंडनाईक यांनी स्थापन केलेल्या धाराशिव सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वप्नराज मंगल कार्यालय येथे संस्थेच्या चेअरमन श्रीमती शुभांगी बाळासाहेब दंडनाईक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेच्या सभासदांना 9 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर दिवंगत व्यक्तींना उपस्थित मान्यवर व सभासदांनी स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच संस्थेचा वार्षिक अहवाल सात्विक बाळासाहेब दंडनाईक यांनी सादर केला. संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक कामकाजाची माहिती सभासदांसमोर मांडण्यात आली. तसेच संचालक मंडळाच्या वतीने सभासदांना 9 टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.

या वेळी प्रशांत पाटील, विक्रम पाटील, दत्ता बंडगर, महेबूब पाशा पटेल, देवानंद सुरवसे, मधुकर जाधव, ॲड. सुधाकर तांबे, ॲड. भालचंद्र मोरे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, मित्रपरिवार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक परवेश सय्यद यांनी केले.


 
Top