धाराशिव (प्रतिनिधी)- देशात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. सध्याची भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता सर्व नियम बाजूला ठेवून सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी असे मत शिवसेना शेतकरी परिषदचे प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडले आहेत.
या पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष दत्ता पवार, रामजीवन बोंदर, धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा. मारूती कारकर, दादासाहेब चेडे, अच्युतराव पुरी, अशोक कारकर, श्रीराम चेडे, प्रफ्फुल खैरे, भैरवनाथ माडजे, शिवाजी कांबळे, तात्या रोडे आदी उपस्थित होते. यावेळी धोंडगे यांनी धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. पुढे बोलताना शंकर धोंडगे यांनी दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 1 लाख रूपये मदत करावी अशी मागणी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्याबाबतीत संवेदनशील नेते आहेत. मागणी मान्य करून लवकरच शेतकऱ्यांना मदत करतील अशी अपेक्षा धोंडगे यांनी व्यक्त केली.
