धाराशिव (प्रतिनिधी)- येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती कमलताई नलावडे यांच्या हस्ते कृष्णाची पूजा करण्यात आली. त्यानंतर नर्सरी ते सीनियर के.जी.च्या चिमुकल्यांनी कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वेशभूषेसहित सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधले. शाळेतील चिमुकल्यांनी राधा, कृष्ण, बलराम, सुदामा आदींच्या वेशभूषा केल्या. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून काल्याच्या प्रसादाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
