धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था तसेच पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांनी सुधारित ‌‘आदर्श उपविधी' स्वीकारावेत,असे निर्देश जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने दिले आहेत.सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी राज्यातील या पतसंस्थांना सुधारित आदर्श उपविधी लागू करण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था तसेच पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांनी त्यांच्या चालू वार्षिक सर्वसाधारण सभेत सुधारित आदर्श उपविधी स्वीकारण्याबाबतचा विषय ठेवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व संबंधित नोंदणीकृत पतसंस्थांना कळविण्यात आले आहे.सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी तयार केलेले सुधारित आदर्श उपविधी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, धाराशिव यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

तरी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था तसेच पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांनी सुधारित आदर्श उपविधी नजीकच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवून ते स्वीकारावेत,असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक धाराशिव पांडुरंग साठे यांनी केले आहे.

 
Top