धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले, गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या श्रीच्या प्रतिष्ठापनासाठी मूर्तिकार श्रीयुत भांगे सांजावेस यांच्या निवासापासून गजवाहक, गरुडाआसनस्थ पालखीतून श्री ची मूर्ती आणण्याची परंपरा आजही टिकून ठेवली आहे.
1964 पासून मंडळ श्री ची प्रतिष्ठापनेची मिरवणूक पालखीमध्ये व गजवाहकाच्या परंपरा टिकवून ठेवली आहे. मंडळाच्या दीडशे लेझीम खेळाडू महाराष्ट्रीयन गणवेशात पांढरा पायजमा व पांढरा शर्ट व भगव्या टोप्या घालून अत्यंत आकर्षक पणे वाद्य वृंदासह व सतत चार तास लेझीमचा खेळ करीत मिरवणूक गवळी गल्ली मध्ये पोहोचली.
मंडळाच्या वतीने 52वर्षापासून प्रतिष्ठापनेची पूजा विधी शुभ हस्ते विश्वेश्वर चं. चपने परिवार व अभियंता,उद्योजक या परिवाराच्या वतीने करीत आले आहे. राष्ट्रीय हिंदी दिन असल्यामुळे हिंदी विषयाचे अध्यापक प्राध्यापक डॉ. इंगळे व डॉ. क्षीरसागर के एम यांचा हिंदी विषयाचे प्रभुत्व व या राष्ट्रीय भाषेचे महत्व मंडळाने त्यांच्या केल्या गेलेल्या सेवेचा व भाषेवर प्रभुत्व असलेल्या अध्यापकांचा ही सन्मान करण्यात आला. या परंपराच्या मागे सर्वधर्मसमभावाची मंडळांनी जोपासना केली आहे. मंडळांनी 1964 पासून विविध देखावे सादर केलेले आहेत.
मंडळाचे मूर्तिकार ,शिल्पकार, चित्रकार व गुणवंत कामगार पुरस्कार व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू, असलेले काशिनाथ दिवटे यांनी बिना साच्याच्या मुर्त्या व हलते देखावे बनवून मंडळाच्या देखाव्यामध्ये ठेवले आहेत. मंडळांनी सामाजिक सेवा विधायक उपक्रमामध्ये गेली साठ वर्षाच्या कालावधीत विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले आहे.
मंडळाचे कार्य यशस्वीरीत्या घडवून आणण्यासाठी मनमत पाळणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गेश दिवटे, सागर पाळणे विश्वास दळवी, वरून साळुंखे, वैभव अंजीखाने,कुणाल दिवटे ,श्रीकांत दिवटे, बुरुंग बंधू, तीर्थकर बंधू ,गिरीश पाळणे, अतुल ढोकर ,सिद्धेश्वर जवळे, ऍड निलेश बारखेडे अमोल दिवटे ,रोहन कोणाळे ,संजय पाळणे ,विशाल देशमाने, सुनील देवळे, आकाशमहामुनी, बसवेश्वर पाळणे, विद्यानंद साखरे ,कल्याण गवळी, नंदकुमार हुच्चे, युवराज हुच्चे, दत्ता वाडकर, राहुल गवळी ,केदार उपाध्ये, साप्ते बंधू ही सर्व लहानथोर मंडळी अत्यंत रात्रंदिवस कष्ट मेहनत जिद्द व भक्ती या श्रीच्या चरणी अर्पण करीत आहेत.

