धाराशिव (प्रतिनिधी)- गणपती बप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..अशा जय घोषात लाडक्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप दिला. शहरातील शंभरहून अधिक गणेश मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपारिक ढोल, ताशा, हलगी, लेझीम त्याचप्रमाणे आकर्षक देखावा सादर केल्यामुळे लोकांनी विसर्जन मिरवणूक रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती. 

विसर्जन मिरवणूक चालू असतानाही रस्त्यावर मिरवणुकीची प्रचंड गर्दी असताना चार चाकी व दुचाकीची वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबेडकर चौक आर्य समाज चौक जिल्हाधिकारी निवासस्थान या चौकात मात्र चालूच होती.यंदा प्रथमच अनेक गणेश मंडळाने चल देखावे सादर केले आहेत. यापूर्वी परराज्यातून अशा प्रकारचे देखावे मागवले जात होते. परंतु यावेळेस मात्र स्थानिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेले देखावे अत्यंत कलात्मक पध्दतीने सादर केले. यावर्षी पण विविध राजकीय पक्षांनी विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धता देखावे यासाठी मोठमोठ्या रकमेचे बक्षीस जाहीर केले होते. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शिवसेनेचे एकमेव व्यासपीठ होते आणि समोरच भाजपचे व्यासपीठ होते. यावर्षी मात्र खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे शिवसेनेत गेल्यामुळे शिवसेनेचे शिंदे शिवसेना व्यासपीठ ठाकरे शिवसेना व्यासपीठ भाजप व्यासपीठ व काँग्रेस व्यासपीठ यांचे स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले होते.

क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळाचे नाव असले तरी विसर्जन मिरवणुकीमध्ये मात्र बानू धनगरीन आणि मल्हारी मार्तंड खंडोबा यांचा विवाह प्रत्यक्ष देखावा सादर केला. परंतु बानुला हळद लावण्याच्या निमित्ताने प्रमाणापेक्षा जास्त भंडारा उधळून पहाण्यासाठी आलेल्या लोकांच्या अंगावर कपड्यावर भंडारा पडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भंडारा उधळण्यापेक्षा फुलाची उधळण केली असती तरी चालले असते परंतु काही का असेना धाराशिव शहरात क्लीन समताने नाविन्यपूर्ण कौतुकास्पद प्रयोग विसर्जन मिरवणुकीत लोकांच्या समोर सादर केला. जय मल्हार गणेश मंडळ धाराशिव यांनी पण उत्कृष्टपणे धनगरी लोकगीतावर उत्कृष्टपणे नृत्य करून आपली कला सादर केली. कै. विलास दादा गणेश मंडळ, रणसम्राट गणेश मंडळ, मराठेशाही गणेश मंडळ, भागीरथी परिवार, साई परिवार आदी मंडळांनी आपल्या कला उत्कृष्ट सादर केल्या. पारधी बांधवांची पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी नृत्य  विशेष आकर्षण ठरले. 


रात्री बारानंतरही मिरवणुका सुरूच

रात्री 12 नंतर पोलिस विभागाने वाद्य वाजविण्यास बंदी केल्यानंतर काही मंडळांच्या लोकांनी शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांची भेट घेवून गेल्या महिन्यापासून आम्ही सराव करतो. आम्हाला कला सादर करू द्या असे सांगितले. त्यानंतर गुरव यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना माहिती दिल्यानंतर खासदार राजेनिंबाळकर यांनी पोलिस अधीक्षक यांना गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली. त्यामुळे पहाटे 3 पर्यंत वाद्यासह मिरवणुका सुरू होत्या. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top