भुम (प्रतिनिधी)- 14 वर्षे वयोगटांमध्ये प्रतीक शिवकुमार तरटे व नमन बालाजी माळी या दोघांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवत जिल्हास्तरावर बाजी मारली आहे .या दोघांची जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
तसेच 17 वर्ष वयोगटामध्ये कुमारी आरती महेश बागडे हिने तालुकास्तर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजय मिळवत जिल्हास्तरावर बाजी मारली आहे. या दोघांनाही मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षकजयंत शिंदे व आप्पा मिसाळ विजयी बुद्धिबळ खेळाडूंचा सत्कार श्री गुरुदेव दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण जाधव, पर्यवेक्षक श्री बांगर सर व गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक भोरे यांनी करून त्यांना जिल्हास्तर स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
