भुम (प्रतिनिधी)- ज्ञानज्योती सावित्री माई फुले शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित भूम ची सर्वसाधारण सभा नुकतीच चेअरमन अंगद मिसाळ यांचे अध्यक्षतेखाली यश मंगल कार्यालय भूमयेथे पार पडली त्यावेळी मिसाळ यांनी वरील घोषणा केल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांचे उपस्थितीत संपन्न झाली. या सभेमध्ये एचआयव्हीग्रस्तांचा सांभाळ करणारे दत्ताभाऊ बारगजे व संध्याताई बारगजे यांना संस्थेने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती आणि नवोदय मध्ये यश संपादन केलेल्या 30 सभासदांच्या पाल्यांचा सन्मान चिन्ह, सॅक आणि डॉक्युमेंट फाईल देऊन सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्त झालेल्या दहा सदस्यांचा मानपत्र व शाल देऊन संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व सभासदांना देण्यात आलेली टिफिन बॅग सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमासाठी राज्यसंघाचे चिटणीस भक्तराज दिवाने राज्यसंघाचे उपाध्यक्ष श्री सोमनाथ टकले तालुका संघाचे अध्यक्ष संजीवन तांबे तालुका संघाचे नेते श्री रामेश्वर शिंदे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन गोकुळ आरेकर दत्तात्रय घुले महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मी इंगळे संचालिका स्मिता जंजिरे, जयश्री माळी,संचालक किशोर कुमार बुरंगे, अच्युत मुळे,श्रीपाद कुंभार, रणजीत सोन्ने,श्रीराम हंगे, दीपक वाळके,अण्णा मोटे, काका डोरले,तात्या ढोरे,लक्ष्मण उमाप यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन दत्ता गुंजाळ आणि दीपक वाळके यांनी केले.
