धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टी स्टेट को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि. आनंद नगर धाराशिव शाखा पाडोळी (आ) वर्धापन दिन आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. कार्यक्रमात सर्वप्रथम शाखा कर्मचारी विशाल ठवरे यांनी शाखे विषयी सविस्तर माहिती दिली त्यानंतर हेड ऑफिसचे रवी रोहिदास यांनी शाखेच्या योजना संदर्भात माहिती दिली त्यानंतर सुरवसे साहेबांनी शेतमाल खरेदी विक्रीची माहिती दिली नंतर गुंड गुरुजी यांनी या मल्टीस्टेटमुळे जनसामान्यांना मोलाची मदत होऊन शाखा सर्वाच्या उपयोगी पडत असल्याचे नमूद केले.

नंतर ॲड. निलेश बारखडे पाटील साहेब यांनी दादाच्या नेतृत्वाखाली ही सहकार चळवळ सर्वसामान्यांच्या विश्वासातून आणि सहकार्यातून उभा राहिल्यामुळे सर्वसामान्याला या संस्थेच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य होत असल्याबद्दल आणि या परिसरामध्ये सहकारी संस्था खंबीरपणे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व्यक्तीसाठी कार्यरत राहून दादांच्या माध्यमातून वाटचाल करत असल्याचे नमूद केले. संस्थेचे चेअरमन ॲड. चित्राव गोरे यांनी काळानुरूप तंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्वसामान्यांना सुविधा निशुल्लक या मल्टीस्टेट मधून देण्यावर भर दिला आहे. याचाही उल्लेख आपल्या मनोगतातून  करण्यात आला. पुढील काळात या सहकारी संस्था आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा कामासाठी उपलब्ध हव्यात यासाठी सर्वांनी आपापल्या परीने सहभाग घेऊन या संस्थेच्या कामकाजामध्ये हातभार लावावा सहकार्य करावे आणि आपणा सर्वांच्या माध्यमातून या सहकारी संस्था अधिक चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात नावारूपाला येतील ही अपेक्षा त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली.

 येणाऱ्या कारखान्याच्या  गाळप हंगामाविषयी चे कारखान्याचे नियोजन याचीही माहिती त्यांनी सर्वांना दिली.  यावेळी मंचावर उपस्थित सुधाकर गुंड गुरुजी, उपाध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव,नरसिंग भाऊ गुंड, राजर्षी शाहू पतसंस्थेचे व्ह. चेअरमन भारत सोनटक्के,पाडोळी गावचे सरपंच सतीश काका एकंडे,  तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित रमेश सूर्यवंशी, संपत रणखांब, नाईक नानासाहेब, गणेश गुंड, वामन गाते, शेषराव गुंड, ज्ञानेश्वर पाटील, गुरुलिंग राऊत, तसेच आंबेडकर मल्टीस्टेट चे कर्मचारी स्टाफ, लोन अधिकारी सचिन भोसले, डेटा अनालीसीस अधिकारी रवी रोहिदास, शाखा व्यवस्थापक  विशाल ठवरे, राहुल गुंड, पूजा पाटील,सुमंत काजळे, हिंगळजाई फार्मर प्रोडूसर कंपनी चे कर्मचारी अशोक सुरवसे,गणेश वळके, रितेश ढवण, व बचत गट कर्मचारी सौ. सविता जाधव व जमलेले मान्यवर सभासद.


 
Top