धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण संस्था शैक्षणिक क्षेत्रात दिपस्तंभासमान आहे. त्यामुळे शिवसेना जिल्हासंघटक सुधीर पाटील यांचे शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक व राजकीय कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत होऊन पक्षवाढीबरोबर जनसामन्यांच्या विकास राज्य सरकारमार्फत नक्कीच होईल असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
येथील हातताई मंगल कार्यालयामध्ये गुरुवर्य के. टी. पाटील यांची 97 वी जयंती व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा 64 वा वर्धापन दिन योगेश कदम गृहराज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम व सत्कारांनी शिक्षण प्रेरणा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आदर्श शिक्षणप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर केशव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेत संस्थेचा इतिहास व सुरु असलेल्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडले.
मराठवाड्यात शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 शैक्षणिक संस्था, 20 पालक, निवृत्त झालेले कर्मचारी, आदर्श शिक्षक, यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी सहकारी बँकेचे चेअरमन संजय केशव पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, युवा उद्योजक अभिराम पाटील, हभप. प्रकाश महाराज बोधले, सर्वच क्षेत्रातील मान्यवर व विविध पक्षातील पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)

