भूम (प्रतिनिधी)-  येराळा प्रोजेक्ट सोसायटी, न्यू दिल्लीच्या तपासणी पथकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (पा.) येथे भेट देऊन शाळेतील विविध सुविधांची सखोल पाहणी केली. पथकप्रमुख आत्रेयी भांजो न्यू दिल्ली, श्रीपाल सप्तसागर, गायकवाड व महेश कुलकर्णी सांगली यांनी सर्वप्रथम विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाची पाहणी केली.

यानंतर शालेय परिसर, वृक्षारोपण, भौतिक सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर बाबींची पाहणी करून पथकाने समाधान व्यक्त केले. सर्व काही युनिक आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी शाळेच्या व्यवस्थेचे कौतुक केले. पथकाने वर्गांना भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. स्वच्छतागृहाच्या सुविधेबाबत त्यांचे अभिप्राय जाणून घेत तसेच आणखी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याबाबत हितगुज केले. विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद व आत्मविश्वास पाहून पथकाने आनंद व्यक्त केला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आण्णा मारुती महानवर, माजी अध्यक्ष शिवदास लोकरे, पालक अमोल उबाळे, हनुमंत महानवर, मदतनीस नभाताई महानवर, कांबळे, शालेय समितीचे सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक आणि माजी विद्यार्थी संघाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पोतरे माधव यांनी केले. तर आभार पोतरे धनलक्ष्मी  यांनी मानले. 


 
Top