तेर( प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूल येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी राजीव कॉम्प्युटरचे पवन लाकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड होते. यावेळी बिबीशन देटे, सूर्यकांत जाधव, दत्तात्रय लंगडे, रमेश लाखापते, नवनाथ पांचाळ, सतीश फंड,सुचिता कोल्हे, सुधाकर चव्हाण, निळकंठ लाकाळ ,राधाकृष्ण राऊत आदी उपस्थित होते.
