तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूल येथील सहशिक्षक रमेश लखापते यांची कन्या वैष्णवी लखापाते यांची पवित्र पोर्टलद्वारे सांगली येथे शिक्षिका पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तेरणा प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड, नवनाथ पांचाळ,बिभीषण देटे, सूर्यकांत जाधव, दत्तात्रय लंगडे ,सतीश फंड ,निळकंठ लाकाळ, राधाकृष्ण राऊत, सुचिता कोल्हे, सुधाकर चव्हाण आदी उपस्थित होते.
