तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची गंज जळाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील लक्ष्मण भागवत कदम व राणी लक्ष्मण कदम यांच्या मौजे तेर येथील गट नंबर 410 मध्ये सोयाबीन काढणी करून मळणीसाठी ठेवलेली गंज अज्ञात व्यक्तीने 27 सप्टेंबरच्या रात्री अंदाजे बारा ते साडेबाराच्या दरम्यान  पेटवल्यामुळे गंज पूर्णपणे जळून नष्ट झाली आहे. यामुळे सदर शेतकऱ्याचे अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाले. याबाबत तेरचे ग्राम महसूल अधिकारी महादेव कदम यांनी पंचनामा केला आहे.

 
Top