भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मानाचे गणेश मंडळ श्री. चौंडेश्वरी तरुण एकता मंडळ यंदा 81 व्या वर्षात पदार्पण करित आहे त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर अश्या विविध शिबिरांचे आयोजन दि. 20 सप्टेंबर रोजी श्री.चौंडेश्वरी मंगल भवन येथे करण्यात आले आहे. तसेच सर्व वयोगटातील मुले मुलांसाठी विनामूल्य नृत्य स्पर्धा दि.21 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. जय भवानी नाटक मंडळ वालवड यांचा “रक्त झालं वैरी अर्थात पदर पसरते बाळासाठी“ या नाटकाचा प्रयोग दि. 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. तसेच महाराष्ट्रभर लहान मुलांसाठी आकर्षण ठरणारा जादूगार जे जे यांचा जादूचा प्रयोग  दि. 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. वरील सर्व कार्यक्रम हे कोष्टी गल्ली येथील गणेश मंडळाच्या स्टेजसमोर होणार आहेत. तरी वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.चौंडेश्वरी तरुण एकता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top