भुम (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे भूम हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करताना 241 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पाथरुड ते पाटसांगवी रोडवरील हॉटेल सध्याद्री येथे विनापरवाना गांजा बाळगून तसेच देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री करीत असलेल्या अरुण गोवर्धन जाधव, वय 27 वर्षे, रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव याच्यावर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये आरोपीच्या ताब्यातून 241 ग्रॅम हिरवट-काळसर रंगाचा गांजा, अंदाजे किंमत 12,050 जप्त करण्यात आला. तसेच देशी दारूच्या एकूण 136 बाटल्या व बीअरच्या 4 बाटल्या असा एकूण 23,750 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाणे भूम येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक धाराशिव रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भूम अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, सपोनि खांडे, पोलीस अंमलदार कवडे, कवडे, जाधव, चेडे, नाईकवाडी, किवंडे व मोटे यांनी केली.
