धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचा अग्रदूत म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या गुजर गल्लीतील 'श्री त्रिमूर्ती गणेश मंडळाने' (गुजर गल्लीचा राजा) यंदा आपल्या स्थापनेच्या 46 व्या वर्षात अत्यंत दिमाखात पदार्पण केले आहे.
सन 1981 मध्ये अवघ्या 5 ते 6 सदस्यांच्या उपस्थितीत लहान स्वरूपात सुरू झालेल्या या मंडळाचा प्रवास आज एका मोठ्या आणि अथांग 'त्रिमूर्ती परिवारात' रूपांतरित झाला आहे.
फक्त 10 दिवसां पुरता मर्यादित विचार न करता, वर्षभर विविध लोकोपयोगी आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणारे मंडळ म्हणून त्रिमूर्ती मंडळाने संपूर्ण जिल्ह्यात आपला एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
वर्षभराचा दैदिप्यमान सामाजिक, वैद्यकीय व पर्यावरणपूरक उपक्रमांचा आलेख:
गेल्या साडेचार दशकांत मंडळाने समाजाप्रती आपले ऋण मानून प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. मंडळाच्या वर्षभरातील उपक्रमांचा सविस्तर लेखाजोखा खालीलप्रमाणे:
वैद्यकीय सेवा व आरोग्य उपक्रम: मंडळाच्या वतीने दरवर्षी भव्य आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. हे सर्व वैद्यकीय उपक्रम डॉ. रोहन झाडे, डॉ. ऋषिकेश झाडे, डॉ. ओम झाडे व डॉ. दीप झाडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीपणे राबवले जातात.
पर्यावरणपूरक चळवळ: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंडळाच्या वतीने वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जाते. या पर्यावरणपूरक उपक्रमांचे नेतृत्व मनोज फाटक ओंकार जगदाळे अक्षय फडकुले, अक्षय गांधी व ऋषभ गांधी हे समर्थपणे करत आहेत. सरकारी योजना व शेतीविषयक प्रबोधन: सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे आणि शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातात. याचे नियोजन रोहित झाडे, बालाजी दळवे, आकाश देशमुख व श्रीकृष्ण निकम यांच्या माध्यमातून केले जाते.
समाजप्रबोधनपर देखावे व जनजागृती: दरवर्षी गणेशोत्सवात समाजाला दिशा देणारे देखावे आणि जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले जातात. या महत्त्वपूर्ण उपक्रमांमागे वैभव मेंगले , प्रशांत रेडेकर, प्रशांत हरभरे, प्रेम जाधव, आकाश लोखंडे, राकेश धारूरकर, अमित जगधने , प्रसाद खरमाटे, श्रेणीक (बंटी) माशाळकर, रोहित कांबळे व प्रसाद महामुनी यांचे खंबीर मार्गदर्शन लाभते.
रुग्णसेवा व महिला सक्षमीकरण: वर्षभरातील इतर सामाजिक कार्यांतर्गत सिव्हिल हॉस्पिटल (जिल्हा रुग्णालय) मध्ये जाऊन रुग्णांना फळवाटप करणे, तसेच महिला दिनाचे औचित्य साधून नवजात बालकांसाठी 'बेबी कीट' वाटप करण्याचे स्तुत्य उपक्रम मंडळ राबवते.
या सर्व कार्यात गुजर गल्लीतील युवा वर्ग हिरीरीने मदत करतो. या युवा शक्तीला , मकरंद पोतदार, पारस येनेगुरे, चिन्मय जगधने , रुद्र म्हेत्रे, माउली पोतदार, रोहन कांबळे, सोनू हरभरे व आशिष तोडकरी यांचे कुशल मार्गदर्शन लाभते. नयनरम्य रोषणाई व सजावट: दरवर्षी गणेशोत्सवात मंडळाचा मंडप आणि देखाव्याची आकर्षक रोषणाई व सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेते. या विद्युत रोषणाईची धुरा मयूर मसे व सोनू राऊत हे आपल्या मार्गदर्शनाखाली चोख बजावतात.
संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांचे लाभलेले बळ:
मंडळाच्या स्थापनेपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत प्रत्येक कार्यात मंडळाचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांचे आशीर्वाद हेच मंडळाचे खरे आधारस्तंभ आहेत. यामध्ये बाळकृष्ण झाडे, संतोष जहागीरदार, गोपाळ म्हेत्रे, प्रशांत बेद्रे, भीमाशंकर झाड़े, निशिकांत भोज, राहुल जगधने , प्रभाकर खरमाटे, प्रशांत येणेगुरे, जितेंद्र झाडे, सतीश कुलकर्णी व नागनाथ मुसळे या ज्येष्ठ मंडळींच्या अखंड मार्गदर्शनामुळेच नव्या पिढीला काम करण्याचे मोठे बळ आणि ऊर्जा मिळते. लोकसंपर्क आणि राजकीय पाठबळ:मंडळाचे हे जनहितार्थ कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आणि लोकांपर्यंत योग्य रितीने पोहचावे, यासाठी संजय जहागीरदार व अजित माळी हे प्रसिद्धी माध्यमांचे काम सांभाळण्यासाठी सदैव तत्पर असतात. तसेच, मंडळाला किंवा गल्लीला कुठेही, कसलीही अडचण आली, तर शहराचे खंबीर नेतृत्व नगरसेवक प्रदीप भैय्या मुंडे आणि नगरसेवक पंकज भैय्या पाटील हे मंडळाच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे डोंगरासारखे उभे राहतात, अशी कृतज्ञता मंडळाने व्यक्त केली आहे.

