धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये गणेश उत्सवानिमित्त माती पासून गणेश मुर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली इ.5 वी विभागातील सुमारे 400 विद्यार्थ्यांने सहभाग नोंदवला . या कार्यशाळेस संस्कार भारती धाराशिव समितीच्या अंजली शेटे- विळेगावे यांनी गणेश मुर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे व कार्यशाळा प्रमुख व्ही.एल. पवार पर्यवेक्षक शेषनाथ वाघ यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, गुरुवर्य के.टी. पाटील यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळा प्रसंगी उपप्राचार्य संतोष घार्गे, कैलास कोरके,उपमुअ प्रमोद कदम, पर्यवेक्षिका बी.बी.गुंड, पर्यवेक्षक के.के.पाटील, बी.एम.गोरे, कलाध्यापक शिवाजी भोसले उपस्थित होते. सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी सहशिक्षक ए.व्ही.शेंडगे, ए.एच. माने, एन.सी. देशमुख, एम.एस.पाटील, एच.व्ही.माळी,मुंडे, पी.डी. परतापुरे, एस.व्ही.लोकरे, पी.एस.मोरे, एस.एम.राऊत, एस.डी. बीरगड, सेवक महादेव काळे, दत्ता वाडकर, प्रशांत जाधव आदी शिक्षक शिक्षकेत्तर यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश मुर्ती साकरल्या.
