तुळजापूर (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील सरपंच अजित क्षीरसागर यांच्यासह सुधीर सोनवणे, अभिजीत तोडकरी,संतोष सगरे आणि दीपक थोरात यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
युवा नेते ऋषिकेश मगर, सोमनाथ गुरव, काठीचे सरपंच सुजित हंगरकर, गोपाळ सुरवसे व अण्णा तनमोर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. शिवसेनेच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात सहभागी झालेल्या सर्व नवनियुक्त शिवसैनिकांचे यावेळी मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आपसिंगा येथील या पक्षप्रवेशामुळे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढण्यास निश्चितच मदत होणार असून, आगामी काळात पक्षाची विचारधारा आणि विकासाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व नवनियुक्त शिवसैनिक सक्रियपणे योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
