धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या तृतीय गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. 24 सप्टेंबर) शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार यांच्या हस्ते कारखाना स्थळी करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन पाटील यांनी प्रस्तावित भाषणात चालू हंगामात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आल्याने खरिप पिके वाया गेली आहेत. एनव्हीपी शुगर कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून शेतकऱ्यांना गळीत हंगाम 2026-27 मध्ये ऊसाच्या माध्यमातून आधार देणार असल्याने सदरील गळीत हंगामात ऊसाला 3100/- दर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून पंधरवडा संपल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बील जमा करण्याची परंपरा चाचणी गळीत हंगामापासून ठेवण्यात आली आहे. यापुढेही शेतकऱ्यांचे ऊस बिल प्रत्येक पंधरवाडा संपल्यावर जमा करण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच कारखान्याची कामे कमी कालावधीत अधिकारी व कर्मचारी यांनी पुर्ण केली आहेत. कर्मचाऱ्यांस 10% पगारवाढ करून गळीत हंगामास शुभेच्छा चेअरमन पाटील यांनी दिल्या.
या कार्यक्रमास कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील, धनंजय पाटील, चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील, कार्यकारी संचालक कृष्णा पाटील, आदित्य पाटील, प्लँट सुपारवायझर विजय वाघे, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चिफ केमिस्ट प्रविण एडके, इलेक्ट्रिक इंजिनिअर प्रविण यादव, मिल फोरमन प्रविण पाटील, पॅन इंचार्ज गोविंद जाधव, बॉयलर अटेंडन अजय गाडे, टर्बाईन अटेंडन परमेश्वर वीर, सेंट्री मेट रफिक वस्ताद, सुरक्षा अधिकारी मेजर चंद्रकांत पवार, सुधाकर खोत, परचेस अधिकारी रवि जोगदंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, अमर पुंड, विक्रम कोळी, पांडुरंग कावळे, विठ्ठल लाकाळ, प्रदिप लोमटे,अतुल माने, परमेश्वर खोचरे, अविनाश कावळे, आकाश थोरात, उफाडे मास्तर, हनुमंत चौगुले, रफिक तांबोळी, शेतकी विभाग राजाभाऊ केवळाराम, यांच्यासह ऊस वाहतूक ठेकेदार, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
