धाराशिव  (प्रतिनिधी)- रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव यांच्या संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा “नातं व्यवसायापलीकडचं..!” या ब्रीदवाक्याला साजेशा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. सभेत दोन्ही संस्थांच्या सभासदांना 11 टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड यांनी केली.

सभेस रुपामाता उद्योग समूहाचे मार्गदर्शक तथा चेअरमन सुधाकर गुंड गुरूजी, जिल्हा सहकार बोर्डाचे अधिकारी मधुकर जाधव, संचालक ॲड. अजित गुंड पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रुपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले तसेच मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर यांनी  दोन्ही संस्थांचा वार्षिक अहवाल वाचन केला.  संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा, व्यवसायवृद्धीचा, सभासदाभिमुख उपक्रमांचा तसेच आगामी योजनांचा आढावा सभेसमोर मांडण्यात आला. सभासदांच्या विश्वासामुळे संस्थांनी विविध क्षेत्रांत सातत्याने प्रगती केली असून, भविष्यातही सभासदांना अधिकाधिक सक्षम व दर्जेदार आर्थिक सेवा देण्याचा संस्थेचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी  रुपामाता अर्बनचे संचालक  शंकर गाडे, पांडुरंग लोमटे, संदीपान गुंड, गंगुबाई चौधरी, रुक्मिणी पवार, सहदेव ढाकरे यांची उपस्थिती होती. सभेदरम्यान सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व कर्मचारी यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या पारदर्शक कारभारासोबतच सभासदांशी असलेले विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.

 
Top