तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेस या वर्षीच्या आर्थिक वर्षात 93 लाख 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला  असून संस्था यावर्षी सभासदांना 11 टक्के दराने  लाभांश देण्यात येणार असून संस्थेच्या 1024 सभासदांना याचा लाभ होणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण नन्नवरे यांनी सांगितले ते संस्थेच्या दि. 24 सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये बोलत होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मधुकर जाधव जिल्हा सहकार अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी मधुकर जाधव यांनी उपस्थित सभासदांना संस्था आणि सभासद हक्क ,अधिकार आणि कर्तव्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. सभेमध्ये  सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन संस्थेचे सचिव सज्जन जाधव यांनी केले. संस्थेचे हे चोविसावे वर्ष असून संस्थेकडे भाग भांडवल म्हणून 1 कोटी 62 लाख 15  हजार रु असून संस्थेची 25 कोटी रुपयांच्या ठेवी कडे वाटचाल सुरू आहे. तसेच संस्थेनं आपल्या सभासदांना लहान मोठ्या उद्योग व्यवसायवाढीसाठी 18 कोटी 66 लाख रुपये कर्ज वाटप केले असून संस्थेची कर्ज वसुली 97% इतकी आहे संस्थेने स्वतःच्या नावाने विविध बँका मध्ये ठेवीच्या स्वरूपात 8 कोटी 30 लाख रुपयांच्या ठेवी मध्ये गुंतवणूक केलेली आहे. संस्थेस सतत लेखापरीक्षण वर्ग अ असून संस्थेच्या वतीने आकर्षक व्याजदराने सर्वप्रकारच्या ठेवी स्वीकारण्याची सोय करण्यात आली असून संस्थेच्या सभासदांना अत्यल्प व्याजदरात सोनेतारण वाहन तारण स्थावर मालमत्ता तारण अशा अनेक प्रकारच्या कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येत.े सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता व व्यावसायिकता या प्रमुख तत्वांवर संस्थेचे कामकाज सुरू असून त्यामुळे सभासद व ठेवीदार यांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.  संस्थेने भागभांडवल, ठेवी, कर्जव्यवहार, निधी, निव्वळ नफा व गुंतवणूका या सर्वच आर्थिक बाबीमध्ये प्रगती केली आहे. तसेच कर्जवसुली, एनपीए, सिडी रेश्यो या निकषांचे तंतोतंत पालन केले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष नारायण नन्नवरे यांनी दिली आहे. 


लवकरच संस्थेची स्वमालकीची इमारत बांधकाम

संस्थेची तुळजापूर खुर्द येथे स्वमालकीची साडेतीन गुंठे जागा असून संस्थेकडे 1 कोटी 15 लाख इमारत निधी जमा असून त्यातून संस्थेच्या इमारत बांधकामास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

संस्थेच्या या वार्षिक सभेस संस्थेचे व्हा चेअरमन संजय व्हटकर संचालक श्रीकांत भोजने, रवींद्र ताटे, बालाजी डोंगरे, दिपक कुंभार,अनुराधा गायकवाड , श्रीकांत देशमाने , संतोष इंगळे, शरयू जाधव, ऍड अंजली साबखे, ऍड अजिंक्य नन्नवरे, प्रा अभय देशमाने यांच्या सह बहुसंख्य सभासद, खातेदार ठेवीदार उपस्थित होते सभेच्या यशस्वीतेसाठी अभिजित म्हेत्रे सुनील शेरेकर प्रवीण मोरे आदित्य व्हटकर माधुरी जाधव तानाजी फुलसुंदर आशिष भोजने  जावेद शेख भागवत गुंड गणेश ठेले श्रीनिवास मुळे मधुकर साळवे सुरज जगताप यांनी परिश्रम घेतले सभेचे सूत्रसंचालन  बालाजी डोंगरे यांनी केले तर ऍड अंजली साबळे यांनी आभार मानले.

 
Top