तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे तुळजापूर खुर्द येथील वनक्षेत्र गट क्रमांक 44 येथे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी 12 तासांत तब्बल 66 हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याबरोबरच वृक्षलागवडीचा विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी वन विभागासह विविध शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था  सज्ज झाल्या आहेत


12 तासांत 66 हजार रोपांची लागवड

तुळजापूर तालुक्यातील वनक्षेत्र गट क्रमांक 44 येथे निर्धारित कालावधीत 66 हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड केली जाणार आहे. अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचा हा उपक्रम आहे. सामूहिक सहभागातून होणारी ही वृक्षलागवड पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, तुळजापूर तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन वनक्षेत्र वनपरिक्षेत्राधिकारी यांनी एनएस पचरंडे यांनी केले आहे  

 
Top