तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे नागपंचमी निमित्ताने महिलांनी नाग देवतेच्या मुर्तीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

तेर येथे विविध मंदिरांमध्ये नाग देवतांची मुर्ती आहेत.महीलानी सकाळपासून नाग देवतांच्या मूर्तीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.नागपंचमी निमित्ताने महीलानी विविध मंदिरात गोल रिंगण करून भुलया खेळून विविध गाणे म्हणत नागपंचमी साजरी करून अनेक महीलानी नागपंचमी निमित्ताने झोका खेळण्याचा आनंद घेतला .धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्रावण महिन्यातील पहीला सोमवार असल्याने विविध शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.धाराशिव तालुक्यातील तेर येथे कालेश्वर, उत्तरेश्वर, चंद्रेश्वर शिखरेश्वर,जंगलेश्वर, सिद्धेश्वर, पिप्पीलिकेश्वर, मेंढेश्वर, अमृतेश्वर, वाळकेश्वर, निलकंठेश्वर, श्रीशैल्य, काशिविश्वेश्वर, रक्तेश्वर, कणकेश्वर, इंद्रेश्वर, मल्लिकार्जुन या तेर येथील विविध मंदिरात श्रावण महिन्यातील पहीला सोमवार असल्याने भाविकभक्त यांनी पहाटेपासूनच सायंकाळपर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती.


 
Top