तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर परिसरात" हरीत धाराशिव" उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग धाराशिव च्या उपअभियंता आरती हाडपत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अभियांत्रिकी सहाय्यक एस.यू.शेख, सत्यवान भालेराव, वरीष्ठ सहाय्यक पांडुरंग बेंदरे, कनिष्ठ सहाय्यक अशा नवले, बाजीराव रोकडे,रूबिया फुलारी व अनिकेत बिटे आदी उपस्थित होते.
