धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले , धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळ  62 वर्षापासून गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी 30 ते 32 दिवसाच्या कालावधीमध्ये लहान  मुले मुली, तरुण युवक युवती वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांची शारीरिक क्षमता, शक्ती, जोश, जोम ,उत्साह ,सांघिक भावना व राष्ट्रीय एकात्मता लेझीम सरावास शुभारंभ , वाद्यपूजन व पेढे वाटप करून करण्यात आले.  शुभारंभ  मंडळाचे लेझीम पटू, व मंडळाचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य  व्हॉलीबॉल असोसिएशन उपाध्यक्ष मनमत पाळणे,   व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू, व क्रीडा मार्गदर्शक प्रा. गजानन गवळी, मंडळाचे मूर्तिकार, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू, गुणवंत कामगार पुरस्कतेॅ काशिनाथ दिवटे, विद्या साखरे ,संजय पाळणे ,विश्वास दळवी यांच्या शुभहस्ते विविध वाद्य व लेझीम या मानाच्या साहित्यांची पूजा विधि श्रीफळ वाढवून, पेढे व प्रसाद वाटप करून संपन्न झाली. महाराष्ट्राचा मर्दानी खेळ गणला गेलेला.या लेझीम पथकामध्ये वाद्य वाजविणारे मंडळाचेच कार्यकर्ते असतात. या वाद्य वृंदामध्ये हलगी, ढोल, ताशा, बुलबुल व पॅड इत्यादी वाद्याने दीडशे मुला मुलींना एका ताल व एक सूर  लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक करणारे मंडळ ठरले आहे.

 महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सतत दोन वर्ष प्रथम पारितोषिक मिळविणारे मंडळ मानले गेले आहे. मंडळातील लहान थोर गणेश दूत  गणेश भक्त ,गणेश सेवक, वरून साळुंखे, कुणाल दिवटे, मनोज अंजीखाने, युवराज हुच्चे,  मुझे मिल पठाण. दत्ता वाडकर  केदरउपाध्ये ,दहीहंडेबंधू , देशमाने बंधू ,बसवेश्वर पाळणे, बुरुंग बंधू, तीर्थकर बंधू  राहुल गवळी, श्रीकांत दिवटे  ,सालपे बंधू, कल्याण गवळी , , अतुल ढोकर, दुर्गेश दिवटे, सिद्धेश्वर जावळे  मिलिंद वैद्य ,सागर पाळणे, , संदीप पाळणे  संतोष दहीहंडे, सच्चिदानंद पोतदार आकाश महामुनी, सुनील देवळे, ऋषिकेश चव्हाण गिरीश पाळणे व मुलींचा महिलांचा मोठा सहभाग या गणेशोत्सवामध्ये आजही तागायत जिवंतपणा ठेवला आहे. सरावास एक महिना पूर्ण मिळावा ज्यामुळे लेझीम प्रकार लेझीम खेळाची क्षमता जोश, दम व आनंद इत्यादी टिकावा या उद्देशाने वाद्य पूजन करून सुरुवात करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भालचंद्र हुच्चे व आभार राजकुमार दिवटे यांनी मानले . 

 गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय ,हर हर महादेव ,आई राजा उदे उदे ,भारत माता की जय ,वंदे मातरम अशा विविध घोषणाने प्रांगण दुमदुमले होते.  सर्वांना निरोगी जीवनप्राप्त व्हावे. अशी श्रीचरणी प्रार्थना करण्यात आली.  शोभेची दारू व फटाक्याच्या आतषबाजीच्या आवाजात लेझीम खेळायला सुरुवात करण्यात आली.

 
Top