तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या दालनात जाऊन पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन करून सत्कार करण्यात आला.

यावेळी आगामी दसरा व शारदीय नवरात्र महोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुख्याधिकारी रणदिवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी नगरसेवक  कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे  गटनेते औदुंबर कदम, ऋतुराज भोसले, रवी दादा भोसले, कृष्णा काळे, कुणाल जाधव, गटनेते औदुंबर कदम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top