तेर (प्रतिनिधी)- युवकांनी आपली उर्जा सत्कार्यासाठी वापरावी. असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लातूर विभाग प्रमुख राजेश संन्याशी यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित 'युवा संमेलन' कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना राजेश संन्याशी बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी भूषण महेश जमाले हे होते. पुढे बोलताना राजेश संन्यासी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजहितासाठी काम करते.युवकानी उच्च ध्येय ठेवावे.युवकांना चांगली दिशा मिळणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कार्यवाहक योगेश लोमटे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रथमेश जाधव यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. तेर येथे आयोजित युवा संमेलनात युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना राजेश संन्याशी यांनी समपक उत्तरे दिली.

 
Top