तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर शहरातील सर्व अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून संबंधीत मूळ व्यवसाय मालकांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी नगराध्यक्ष विनोद गंगणे व त्यांच्या नगरसेवक सहकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील प्रभागामध्ये काही ठिकाणी संबंधित परवानगी व नियमांचे पालन न करता अवैध व्यवसाय म्हणजे मटका, जुगार, हातभट्टी, ताडी, दारू विक्री, अंमली पदार्थ, अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असून, अशा व्यवसायांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता तसेच सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित ठिकाणी तात्काळ पाहणी करून व्यवसायाची कागदपत्रे, परवाने व इतर आवश्यक बाबींची तपासणी करण्यात यावी. आवश्यक परवानगी नसल्यास अथवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करून करण्यात यावी. 

यासाठी नियमित तपासणी व आवश्यक प्रतिबंधात्मक तात्काळ 03 दिवसाच्या कार्यवाही करून संबंधीत मूळ मालकावर गुन्हा नोंद करण्यात यावा. अन्यथा मी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्यासह आपल्या कार्यालयासमोर  लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. असा इशारा निवेदनात दिला आहे.

 
Top