परंडा (प्रतिनिधी)- येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात आय बी एफ एस ए व महाविद्यालयाच्या  संयुक्त विद्यमाने कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.महेशकुमार माने स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन समितीचे विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांची उपस्थिती होती.

मुलाखती घेण्यासाठी प्रणव कापसे ॲक्सिस बँकेचे विभागीय व्यवस्थापक हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील पदवी झालेल्या विद्यार्थ्यासाठी या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.या कॅम्पस मुलाखतीसाठी एकूण 28 विद्यार्थी उपस्थित होते. तर 9 विद्यार्थी प्रथम चाचणी मध्ये पात्र झाल्याने त्यांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.डॉ. अरुण खर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले अध्यक्षीय समारोप डॉ.महेश कुमार माने यांनी केला प्रणव कापसे यांनी विद्यार्थ्यांना  बँकेमधील विविध संधी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील व शहरातील तालुक्यातील विद्यार्थी या मुलाखतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top