भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत अमेरिकेतील नासा येथे भेट देण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल भूमचे चार विद्यार्थी यशस्वी झाले . इयत्ता सातवी अविष्कार माने,  नववी वर्गातून चंदन जगदाळे, आदिती मदने ,निरंजन माळी या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. चंदन जगदाळे हा विद्यार्थी जिल्ह्यात पाचवा आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील पवार काकासाहेब पवार, उत्तरेश्वर पायघन, दत्तात्रय गुंजाळ या गणित, विज्ञान, इंग्रजी शिक्षकांनी सखोल मार्गदर्शन केले होते . यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार भूम एस. टी. डेपोचे मॅनेजर उल्लास शिंनगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी शिनगारे साहेब म्हणाले की,  विद्यार्थ्यांनो आपण आपल्या ज्ञानाच्या बळावर जगामध्ये जाऊ शकतो तेथील तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो त्यासाठी अभ्यास आवश्यक असतो. तुम्ही अभ्यासात असे सातत्य ठेवावे. यावेळी मुख्याध्यापक तात्या कांबळे यांच्या हस्ते शिनगारे यांचा पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानक प्रमुख श्रीकांत सुरवसे, गणेश वाघमारे, काकासाहेब पवार, उत्रेश्वर पायघन ,अविनाश जोशी, दत्तात्रय गुंजाळ,प्रतिभा मुकटे, नितीन पवार, कैलास शिंदे,सुनिल जाधवर, हरीश साठे,अनंता झरकर  उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी  केले.


 
Top