धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे सालाबादाप्रमाणे यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेत 29 विदयार्थी गुणवत्ताधारक झाले असून हे देदिप्यमान यश प्रशालेने प्राप्त केले आहे. या सर्वांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
इयत्ता आठवी स्कॉलरशिप मध्ये 218 पेक्षा अधिक गुण घेणारे 20 तर पाचवीत 9 विद्यार्थी असून, आठवीतून मयुरेश स्वामी 270 गुण घेऊन प्रशालेत प्रथम आला. तर 262 गुण घेऊन द्वितीय क्रमांक सावंत सिद्धी हिने पटकावला. तर तृतीय क्रमांकावर दळवे अक्षरा व थिटे सत्यम यांनी 260 गुण घेतले. तर चौथ्या स्थानावर असलेल्या कु.अर्पिता मुळे हिने 258 गुण घेतले. तर पाचव्या स्थानावर असलेल्या .मनस्वी इंगळे हिने 246 गुण, कुंभार सार्थक - 242, कदम प्रणव व पवार तेजश्री 240 तानगे आकांक्षा व लोमटे श्रेया 338, चव्हाण सायली व जाधव सोहम 236, पवार रुद्र 234 ,शेटे पुनीत व लांडगे वेदांत 230, जाधव सागर 228, कांबळे दृष्टी, उंबरे मुक्ता 218, पवार हेरंब 216 गुण प्राप्त करून यश मिळविले.
इयत्ता पाचवीमध्ये प्रथम क्रमांकावर कु.आरोही अर्जुने हिने 276 गुण घेतले. तर द्वितीय क्रमांकावर वाघमारे परिक्षित 252 गुण तर तृतीय क्रमांकावर देशमुख समरजित 230 गुण तर चौथ्या स्थानावर शिंदे आयुष याला 224 गुण तर पाचव्या स्थानावर असलेला कवडे श्रीतेज 222, पवार आरोही 218, सावळे आदित्य व टेकाळ प्रसन्ना 208, म्हेत्रे प्रणव 205 गुण प्राप्त झाले. या सर्व विद्यार्थ्यांचा व त्याचबरोबर या परीक्षेत पात्र ठरलेल्या तब्बल 121 मुलांचाही सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी अशा परीक्षेतूनच विविध स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाता येते असे प्रतिपादन केले. यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे,पर्यवेक्षक तथा स्कॉलरशिप विभाग प्रमुख कुमार निकम, राजेंद्र जाधव, बी. बी. गुंड, शेषनाथ वाघ, बालाजी गोरे,के.टी पाटील फाउंडेशनचे पर्यवेक्षक शरद क्षीरसागर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे व संबंधित स्कॉलरशिपचे विषय शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे व पाचवी स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख आर. बी.चौधरी यांचा सत्कार केला. तर सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. तर सर्वांचे आभार पर्यवेक्षक शेषनाथ वाघ यांनी मानले.