तुळजापूर (प्रतिनिधी)- आज गुरुवार दिनांक 6/8 /2026 रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती,तुळजापूरचे मुख्य बाजार आवारात बाजार समितीचे आवारात ज्वारी व गहू या शेतमालास उच्चांकी बाजारभाव मिळाला. कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती श्री विजय सर गंगणे व उपसभापती श्री सुहासजी गायकवाड यांचेसमक्ष शेतमालाची लिलावप्रक्रीया पार पडली. बाजार समितीत ज्वारी या पिकास रु.5000/- तर गहु या पिकास रु3000/-/- एवढा उच्चांकी बाजारभाव मिळाला. यावेळी बाजार समितीचे संचालक संतोषजी कदम, श्री बालाजी रोचकरी, दत्तात्रय वाघमारे बाजार समितीचे सचिव श्री उमेश भोपळे, जेष्ठ आडत व्यापारी श्री कोंडीबा
शेळके, श्री सिद्रामप्पा बचाटे, श्री वसंत दाजी पवार, अंकुश नन्नवरे, श्री रुषीकेश भोसले, श्री प्रशांत पाटील. आनंददादा लोमटे, श्री कोंडीबा शेळके, श्री टोंपे, श्री बळी घोगरे, इ. व्यापा-यांसह आडते,व्यापारी, हमाल, तोलार, शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.