तेर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या आवाहनाला नाविण्यपूर्ण प्रतिसाद म्हणून तेर परीसरात रात्री सात ते नऊ पर्यंत मोबाईल  बंद व टीव्ही बंद उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आपली मुले हीच आपल्या कुटुंबाची खरी संपत्ती आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एक छोटासा संकल्प करूया. रोज संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत टीव्ही बंद, मोबाईल बंद तर मुलांसाठी फक्त अभ्यासाचा वेळ,या दोन तासांत मुलांसोबत बसा, त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्या आणि घरात शांत, अभ्यासपूरक वातावरण निर्माण करा. आज दिलेले हे दोन तास त्यांच्या उद्याच्या यशाची भक्कम पायाभरणी करतील."मुलांना वेळ द्या, मोबाईलला नाही"

"शिक्षणाला प्राधान्य द्या, भविष्य उज्ज्वल करा."

चला, प्रत्येक पालकाने हा संकल्प करूया, रोज दोन तास, फक्त मुलांच्या शिक्षणासाठी द्या असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले होते.या उपक्रमास तेर केंद्र अंतर्गत गावात पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


तेर केंद्र अंतर्गत गावात जिल्हा परिषद शाळा व संस्था अंतर्गत शाळेत व गावात सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत विद्यार्थी,विद्यार्थीनी यांना अभ्यास करण्यासाठी मोबाईल बंद व टीव्ही बंद उपक्रम राबविण्यात येत आहे -राजेंद्र मगर प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी,तेर केंद्र


 
Top